नांदेड, दि. ०८ ऑगस्ट:- नांदेड तालुक्यातील विशेष अर्थसाहाय्य योजनेतील डिबीटी न झालेल्या लाभार्थ्यांचे डीबिटी , आधार अपडेट, अनुदान वाटपाचे ईकेवायसी करून घेण्यासाठी मंडळ अधिकारी तरोडा बुद्रुक व वसरणी मंडळ अधिकारी कार्यालयात काल महसूल सप्ताहात विशेष कॅम्प घेण्यात आले.
१ ते ७ ऑगस्ट २०२५ या कालावधीत महसूल सप्ताह आयोजित करण्यात आला होता. उप विभागीय अधिकारी नांदेड डॉ. सचिन खल्लाळ व तहसिलदार संजय वारकड यांच्या मार्गदर्शन नुसार विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. विशेष सहाय्य योजनेचे डीबीटी न झालेले लाभार्थी यांना ग्राम महसूल अधिकारी व महसूल सेवक मार्फत संपर्क साधून लाभार्थी यांचे कॅम्पमध्ये डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांचे डीबीटी , आधार अपडेट, अनुदान वाटपाचे ई केवायसी करूण घेण्यात आली. तसेच शिधापत्रिका धारकांचे ईकेवायसी करुन घेण्यात आले.सदर कॅम्पमध्ये परिविक्षाधिन तहसिलदार अभयराज व नायब तहसीलदार महसूल सुनील माचेवाड यांनी भेटी देवून मार्गदर्शन केले.
कॅम्प यशस्वी करण्यासाठी पोस्ट विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच आधार किट सेतू संचालक व महसूल कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. कॅम्प यशस्वी करण्यासाठी मंडळ अधिकारी वाजेगाव व तुप्पा प्रमोद बडवणे,मंडळ अधिकारी तरोडा बु व वसरणी शिवानंद स्वामी,नांदेड ग्रामिण अनिरुद्ध जोंधळे, शिरिश येवते,कुणाल जगताप,नन्हू कानगुले यांचे सहकार्य लाभले. ग्राम महसूल अधिकारी वसरणी आर पी मुंडे, ग्राम महसूल अधिकारी धनेगाव/ मुजामपेठ दिपक सोनटक्के, ग्राम महसूल अधिकारी वांगी दिलीप पवार, ग्राम महसूल अधिकारी वडगाव प्रिंयका कापसे, ग्राम महसूल अधिकारी वाजेगाव एम के पाटील,
असरजन सज्जाचे ग्राम महसूल अधिकारी मारूती जमदाडे, कौठा सज्जाचे ग्राम महसूल अधिकारी मारुती श्रीरामे, ग्राम महसूल अधिकारी गोपीनाथ कल्याणकर ,शिवाजी तोतरे, दयानंद पाटील, अंकुर सकवान,भास्कर इपर , मोहन कदम, अश्विनी गिरडे ,संगोयो विभागाचे महसूल सहाय्यक सुनिता पोरडवार,प्रतिका मुदगुलवार,दिपाली काळे,आरती सारंग,ऑपरेटर संतोष वाघमारे तसेच पोस्ट ऑफिसचे कर्मचारी गोविंद मुळे,बापूसाहेब येलमेकर सिडको टी एस ओ, रेणुका वडजे, तेजस्विनी घोडके, संतोष निर्मले, सय्यद राऊफ, सय्यद मेहराज, बालाजी नायके व आधार कार्ड किट चे संचालक गंगाधर गिरी,ऋषिकेश मेहकर, शेख नदीम हे उपस्थित होते.
या कॅम्पमध्ये अपंग, विधवा व वयोवृद्ध नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता, डीबीटी झालेल्या लाभार्थ्यांना विशेष सहाय्य योजनेचा योजनेचा लाभ मिळणार आहे.या कॅम्पच्या अनुषंगाने लाभार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यात आल्या.