देगलूर प्रतिनिधी, दि.२२:-देगलूर येथील परमपूजनीय गोळवलकर गुरुजी विद्यालयात आज गीता जयंती निमित्त इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी गीतेतील पंधरावा अध्याय एकत्रितरित्या मुखोद्गगत पठण केलें.
कार्यक्रमाची सुरुवात भगवान श्रीकृष्ण मुर्ती पुजनाने व भारतमाता छ. शिवाजी महाराज व श्री गुरुजी च्या प्रतिमा पुजनाने करण्यात आली या प्रसंगी भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेन्द्र भाऊ आलुरकर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. डॉ. सुरेन्द्र भाऊ आलुरकर यांचे स्वागत कार्यवाह प्रकाश भाऊ चिंतावार यांनी केले तर स्थानिक समन्वय समितीचे अध्यक्ष
रेखावार यांचे स्वागत माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बालासाहेब केंद्रे यांनी केले तर पेठाअमरापूर केंद्राचे प्रमुख किसवे सरांचे स्वागत प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक दमन देगावकर यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत सुरेश कुलकर्णी सरांनी बोलताना म्हंटले की गीता एकच ग्रंथ असा आहे की, तिची जयंती साजरी केली जाते, ज्ञान, भक्ती आणि कर्म यांचा त्रिवेणी संगम म्हणजे गीता.
गीतेमध्ये धर्म, भक्ती आणि जीवन सिद्धांत गायलेले आहे ही गीता रणांगणावर कुरुक्षेत्रावर श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितली.
यानंतर विद्यार्थ्यांनी गीतेतला पंधरावा अध्याय एकत्रित रित्या मुखोद्गत पठण केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.सुरेंद्र भाऊ आलुरकर यांनी समारोपात म्हंटले की,आयुष्यात एकही प्रसंग असा नाही की, प्रश्नाचे उत्तर गीतेत सापडत नाही.
गीता जयंतीच्या निमित्ताने प्रत्येकाने भीष्मप्रतिज्ञाने ईश्वरावर विश्वास ठेवून प्रत्येक कार्य निष्ठेने करावे गीतेचे अध्याय सर्वांनी पाठांतर करावे.
कार्यक्रमाचे ऋणनिर्देश प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक दमन देगावकर यांनी केले तर कार्यक्रमाची सांगता सुजित मुगुटकर यांनी शांती मंत्राने केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरशेटवार अर्चना यांनी केले.
या कार्यक्रमासाठी स्थानिक समन्वय समितीचे अध्यक्ष चंद्रकांतजी रेखावार तसेच स्थानिक समन्वय समितीचे कार्यवाह प्रकाश भाऊ चिंतावार व स्वाध्याय परिवाराचे श्री ज्ञानेश्वर तम्मेवार, संघ परिवाराचे वासरे साहेब तसेच पत्रकार संतोष मनधरणे, विशाल पवार व प्रतिष्ठित व्यक्ती माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक
बालासाहेब केंद्रे व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.यानंतर विद्यार्थ्यांना प्रसाद वाटप करण्यात आला.