देगलूर प्रतिनिधी,दि.२४:- आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आलेल्या रंगोत्सव या चित्रकला, हस्ताक्षर स्पर्धेत परमपूजनीय गोळवलकर गुरुजी विद्यालयातील इयत्ता पहिली ते सातवीतील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.
या स्पर्धेअंतर्गत रंगभरण तसेच हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आली होती .यामध्ये इयत्ता पहिली ते सातवीतील अनेक विद्यार्थ्यांनी बक्षिसे संपादन केलेले आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे गीता जयंतीनिमित्ताचे औचित्य साधून इंटरनॅशनल लेवल साठी बक्षीस वितरण करण्यात आले.
याप्रसंगी विद्यालयाचे स्थानिक अध्यक्ष चंद्रकांत रेखावार तसेच पेठमरापूर केंद्राचे केंद्रप्रमुख किसवे सर व विद्यालयाचे मुख्याध्यापक दमन देगावकर रंगोत्सव प्रतिनिधी सुजाता मॅडम यांच्याहस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करण्यात आले.
उपस्थित सर्व मान्यवरांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले.या स्पर्धेत विजयी स्पर्धकांचे आंतरराष्ट्रीय पातळीवर रंगभरण, हस्ताक्षर स्पर्धात निवड झाली आहे. या स्पर्धेसाठी विद्यालयातील सहशिक्षक सचिन जाधव यांनी परिश्रम घेतले.