देगलूर प्रतिनिधी दि.१७ :- परमपूजनीय गोळवलकर गुरुजी प्राथमिक विद्यालयात नवागताचे स्वागत हा कार्यक्रम घेण्यात आला.याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. चंद्रकांत रेखावार ( स्थानिक अध्यक्ष, देगलूर) , प्रमुख पाहुणे डाॅ.कपील पाटील हे उपस्थित होते.प्रमुख उपस्थित केंद्रप्रमुख दशरथ पांचाळ
पेठअमरापूर गटाचे केंद्रप्रमुख, मा.प्रकाश चिंतावार स्थानिक कार्यवाह ,मा.गिरीश गोले. प्रा. गिरीश वझलवार,डाॅ. सारंग महाराज देगलुरकर ,बाळासाहेब केंद्रे हे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजनाने झाली.यानंतर मंचावरील सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.पद्य पांचारे रूपा यांनी सादर केले.
प्रास्ताविकेत सुरशेटवार अर्चना यांनी शाळेत येण्याचे महत्व, संस्काराचे महत्व,मुल शाळेत आनंदाने रमावे खेळीमेळीच्या वातावरणात रमावे असे सांगितले.
यानंतर सहशिक्षक सुरेश कुलकर्णी यांनी आपल्या भाषणात रामायणातील बोधकथा सांगीतली. समारोपात गिरीष वझलवार यांनी म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी शाळा नेहमी तत्पर असेल असे सांगीतले. दोन महिने शाळा शांत होती पण आज या चिमुकल्यांमुळे शाळा गजबजल्या सारखी वाटत आहे.
यानंतर पहिलीच्या मुलांना पुस्तक वाटप करण्यात आले.तसेच नवीन आलेल्या विद्यार्थ्यांना सर्व शिक्षकांनी गंध लावून स्वागत केले,विद्यार्थ्यांनी भारतमाता,सरस्वतीमाता ,आणि अहिल्यादेवीच्या चरणी पुष्प अर्पण करून तांदळापासून ओम चे रेखाटन करून त्यांचे औक्षण करून घेण्यात आले.
कार्यक्रमाचे आभार विद्यालयाचे मुख्याध्यापक दमन देगावकर यांनी केले .या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अभ्यासपूरकप्रमुख सुरेखा तोटावार, सविता बेजगमवार व सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले. सर्वाच्या सहकार्याने कार्यक्रम संपन्न झाला.