देगलूर मधील एसटी प्रवाशाला लवकरच मिळणार आनंदाची बातमी.

 

 

देगलूर प्रतिनिधी, दि.२२:- देगलूर मधील एसटी प्रवाशाला येत्या तीन महिन्यात देगलूर आगाराकडून नवीन गिफ्ट मिळणार आहे. त्यासाठी कामाला सुरुवात देखील झाली आहे पुढील काही दिवसात देगलूरकरासाठी ई बसच्या नव्या कोऱ्या बस तेही एक दोन नाहीतर तब्बल १० ते १२ बसेस दाखल होणार आहेत.

 

 

 

 

याबाबत सविस्तर वृत्त गेल्या काही वर्षापासून तालुक्यातील वाढती प्रवासी संख्या पाहता वाढीव बसेसची मागणी होती, पण जवळपास सहा ते सात वर्षापासून देगलूर आगाराला एकही बस मिळाली नव्हती. याबाबत एसटी विभागाला अनेकदा पाठपुरावा देखील झाला होता.

 

 

 

 

त्याच मुद्द्याला धरून विद्यमान आगार प्रमुख श्री संजय अकुलवार साहेब यांनी देखील वाढीव बसच्या मागणी संदर्भात पाठपुरावा केला होता. परिणमी देगलूरकरासाठी एक दोन नाहीतर चक्क १० ते १२ ई बसेस तेही नव्या कोऱ्या मीळनार आहेत.

 

 

 

 

त्याच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू देखील झालेले आहे येत्या तीन महिन्यात नव्या ई बसेस मधून देगलूरकर प्रवासाचा आनंद घेऊ शकतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

 

 

 

 

देगलूर मधील भूमिपुत्र व विद्यमान आगार प्रमुख श्री संजय अकुलवार यांच्या कार्यकाळात ही सौगात देगलूर वासीयांना मिळत आहे त्याबद्दल हे अविस्मरणीय राहील अशी चर्चा आहे.

 

हैदराबाद मेट्रो सिटी लगत संपर्क :- 9890476595