देगलूर महाविद्यालयाच्या खेळाडूला विद्यापीठीय जलतरण स्पर्धेत जनरल चॅम्पियनशिप

 

देगलूर प्रतिनिधी,दि.१२:- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड व उत्कर्ष वोकेशन ट्रेनिंग कॉलेज,सगरोळी येथे दि.१०/०८/२०२४ रोजी आयोजित आंतर महाविद्यालयीन विद्यापीठीय जलतरण स्पर्धेत देगलूर महाविद्यालयाची कु.दिक्षा दिपक जोगे या खेळाडूने १०० व ५० मीटर फ्रिस्टाईल मध्ये सुवर्ण पदक तसेच १०० मीटर ब्रेदस्टोक

मध्ये रौप्य पदक अश्या तीन प्रकराची पदक पटकावत देगलूर महविद्यालयासाठी जनरल चॅम्पियनशिप खेचून आणले आहे आणी देगलुर महाविद्यालयाची यशस्वी परंपरा कायम ठेवली आहे.या यशाबदल अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील बेम्बरेकर,

उपाध्यक्ष जनार्धन चिद्रावार, सहसचिव राजकुमार महाजन, कोषाध्यक्ष विलास तोटावार यांच्यासह संस्थेच्या कार्यकारिणी मंडळाचे सदस्य डॉ. कर्मवीर उनग्रतवार, देवेंद्र मोतेवार, नारायणराव मैलागिरे, सूर्यकांत नारलावार, , गंगाधरराव जोशी, रविंद्र अप्पा द्याडे, चंद्रकांत नारलावार, गुरुराज चिद्रावार, विजय उनग्रतवार, सुभाषराव सांगवीकर, गोविंदप्रसाद झंवर यांच्यासह

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन खताळ , उपप्राचार्य डॉ. अनिल चिद्रावार , उपप्राचार्य प्रा. उत्तमकुमार कांबळे, पर्यवेक्षक श्री संग्राम पाटील , कार्यालय अधीक्षक गोविंद जोशी व सर्व प्राध्यापक , कर्मचारी आणि विद्यार्थ्यानी आभिनंदन केले आहे.