बालाजी मैलागिरे व धनाजी जोशी यांच्या प्रयत्नाना अखेर यश
देगलूर प्रतिनिधी दि.०४ :- देगलूर शहर तेलंगणा व कर्नाटक राज्याच्या सीमेलगत असलेले शहर आहे . सीमावर्ती भागातील अनेक प्रवासी या बसस्थानकातून रोज प्रवास करतात , शहरातील जुन्या बसस्थानकाची अत्यंत दुरवस्था झाल्याने प्रवाशांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत होते .
बस स्थानक नूतनीकरणासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन ७८ लाख रुपयाचा निधीही मंजूर करण्यात आला होता मात्र गुतेदाराकडून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केले गेले नाही . गुतेदारकडून जलद गतीने नूतनीकरणाचे काम पूर्ण व्हावे यासाठी बालाजी मैलागिरे व धनाजी जोशी यांनी गेल्या वर्ष भरापासून अनेक वेळा संबंधित विभागाला अर्ज विनंती करून काम पूर्ण करण्याची मागणी त्यांनी केली होती .
परंतु प्रशासनाच्या हालगर्जी पनामुळे त्यांच्या अर्जाची कोणतीही दखल घेतली गेली नाही . त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे याचिका दाखल केली होती सदरील याचिकेवर सुनावणी न्यायमूर्ती आर.व्ही. घुगे व न्यायमूर्ती वाय.जी . खोबरागडे याच्या समोर सुनावणी झाली असता दोन्ही बाजुचा उक्तिवाद ऐकून सदरील नूतनीकरणाचे काम गुतेदाराने वेळेत पूर्ण करावे असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. अपिलाअर्थी याची बाजू ऍड . शिवानंद टेकवाड यानी मांडली.