लायन्स परिवारातर्फे शेकडो पूरग्रस्तांना घरपोच मदत.

 

नांदेड प्रतिनिधी दि.०६ :- आपत्कालीन परिस्थितीत नेहमी मदतीसाठी पुढे असणाऱ्या लायन्स परिवारातर्फे शेकडो पूरग्रस्तांना सलग पाच दिवस अनेक दानशूर नागरिकांच्या मदतीने लायन्सचा डबा वितरित करण्यात आला असून पूर ओसरल्यामुळे हा उपक्रम थांबविण्यात आला असल्याची माहिती प्रोजेक्ट चेअरमन धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी दिली आहे.

 

 

गुरुवारी पूरग्रस्तांसाठी लायन्सचा डबा या उपक्रमाचा समारोप लायन्स आरसी रवी कडगे,लायन्स झेडसी शिवा शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. दिलीप ठाकूर,
लायन्स सेंट्रल अध्यक्ष शिवाजीराव पाटील, सचिव गौरव दंडवते,कोषाध्यक्ष दिपेश छेडा,प्रतिष्ठित व्यापारी सतीश सुगनचंदजी शर्मा,सुरेश शर्मा,संतोष भारती,संजय परदेशी, शिवा लोट,शिवचरण लोट,विलास वाडेकर,प्रसाद देशपांडे, पावडे मामा,

 

 

 

 

 

ठाकूर,मनीषा अग्रवाल,निशा अग्रवाल,जयश्री ठाकूर यांनी प्रत्यक्ष पूरग्रस्तांच्या घरी जाऊन गरमागरम जेवण पुरविले.श्रावस्ती नगर, गंगा चाळ, नल्लागुट्टाचाळ, शिवशक्तीनगर,मील एरिया,गाडीपुरा,शनी मंदिर परिसर,किल्ला या भागातील पूरग्रस्तांना लायन्सचा डब्यामुळे दिलासा मिळाला.या भागातील नागरिक

व्यंकटेश पंजाला,बत्तीनी साई,ताल्ला रमेश, गुर्रम साई,
यलगंटी व्यंकटेश यांनी लायन्स परिवाराला धन्यवाद दिले.

 

 

 

 

पूरग्रस्ताच्या मदतीसाठी सहकार्य करण्याच्या दिलीप ठाकूर यांच्या आवाहनाला अनेक दानशूर नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.नवीन देणगी देणाऱ्यांना मध्ये स्वामी सेवक या नावाने एका भक्ताने ४२१ डबे,स्नेहलता जायसवाल हैदराबाद १००, समदानी मॅडम ५० , हरीभाई मेहता राजस्थान यांनी ४० डबे दिलेले आहेत.

 

 

 

 

 

 

सतीश सुगनचंदजी शर्मा व माधव एकलारे यांच्यातर्फे प्रत्येकी पाचशे डबे देण्यात आले. लायन्स परिवारातील दिलीप ठाकूर यांनी शंभर,बलजीतकौर रामगडिया यानी पन्नास तर दिलीप मोदी,रवी कडगे,राजेंद्र हुरणे,ज्ञानेश्वर महाजन,शिवाजीराव पाटील,नरेश व्होरा,दीपेश छेडा,सुधाकर चौधरी,सुनील साबू यांनी प्रत्येकी चाळीस तसेच पारुल जैन यांनी वीस डब्याची व्यवस्था केली होती.

दानशूर नागरिक वसंत आहिरे ,शिवाजीराव शिंदे,गजानन जोशी,अजय अग्रवाल ,पवनकुमार रमेशचंद्र सारडा,अग्रवाल जिल्हा महिला मंडळ,प्रगती निलपत्रेवार,शंकरराव कामीनवार ,डॉ. अरुण हिवरेकर ,सुधीर विष्णुपुरीकर यांनी प्रत्येकी चाळीस डब्यासाठी योगदान दिले आहे.रमाकांत भंडारे यांनी तीस तर सुधाकर जबडे देगलूर,स्वप्निल चव्हाण,भानुदास काब्दे,अग्रवाल महिला मंडळ नांदेड शहर, रामदास बाबुराव कडतन, सुषमा हुरणे,सुधाकर काळे यांनी प्रत्येकी वीस डबे दिले आहेत.

 

 

 

 

 

पूरग्रस्तांसाठी दानशूर नागरिकांनी व लायन्स परिवाराने भरभरून मदत केली त्याबद्दल लायन्स सेंट्रल अध्यक्ष शिवाजीराव पाटील, सचिव गौरव दंडवते,कोषाध्यक्ष दिपेश छेडा, प्रोजेक्ट चेअरमन दिलीप ठाकूर यांनी सर्वांचे आभार मानले आहे. पुर आला त्या दिवसापासून ते पूर्व ओसरेपर्यंत सलग पाच दिवस गरम जेवण दिल्यामुळे दिलीप ठाकूर व लायन्स परिवाराबद्दल पूरग्रस्तांनी समाधान व्यक्त केले.

 

 

 

 

लायन्स क्लब नांदेड सेंट्रल च्या तर्फे दिलीप ठाकूर यांच्या सेवा कार्याची दखल घेवून पूरग्रस्ताच्या मदती साठी जयेशभाई ठक्कर यांनी लायन्स प्रांतपाल गिरीश सिसोदिया यांच्याकडे आपत्कालीन निधी देण्याचा प्रस्ताव पाठवला होता. त्यानुसार इंटरनॅशनल लायन्स क्लब तर्फे १००० डॉलरची मदत लवकरच नांदेड जिल्ह्यासाठी मिळणार आहे. त्यातून पूरग्रस्तांना तातडीचे साहित्य वितरित करण्यात येणार आहे.