श्री देवांश गणेश मंडळ साईनगर यांच्या तर्फे हास्य कलाकार प्रा.शंकर पाटील यांचा कार्यक्रम संम्पन्न.

देगलूर प्रतिनिधी, दि.१६:-  श्री देवांश गणेश मंडळ साईनगर भायेगाव रोड, येथे दि.१३ शुक्रवारी सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 

या कार्यक्रमास हास्य कलाकार म्हणून प्रा. शंकर पाटील (वै धुंडामहाराज देगलूरकर महाविद्यालय देगलूर) जिल्हा नांदेड. हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. प्रा शंकर पाटील यांनी अनेक राजकीय नेत्यांची, फिल्म अभिनेत्यांचे आवाज,पक्षांचे आवाज, अनेक गाड्यांचे आवाज, ग्रामीण भागातील वास्तव तेवर हास्यकल्लोळ सादर केले.

या एक तासाच्या कार्यक्रमात सर्व प्रेक्षक हास्यकल्लोळात मंत्रमुग्ध झाले. या कार्यक्रमास प्रा.भाऊराव नाईक ( देगलूर महाविद्यालय देगलूर) मुख्याध्यापक श्री जाधव सर भायेगाव शाळा सौ.उप्पलवार मॅडम उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री अतुल नाईक, श्री सचिन म्यानावर, श्री बालाजी गायकवाड, श्री सचिन काब्दे, श्री गंगाधर कुरे, परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी महिलांची प्रचंड गर्दी होती. लहान मुले,देगलूर शहरातील अनेक नागरिक उपस्थित होते.