आचारसंहितेचे काटेकोर पालन करा – जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत

 

नांदेड प्रतिनिधी,दि.०४:-  आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांच्या सुचना

लोकसभा पोटनिवडणुकीसाठी अंतिम १९ उमेदवार
नऊ विधानसभेसाठी १६५ उमेदवार रिंगणात असल्याची माहिती येत आहे.

 

 

लोकसभेसाठी १९ लाख ८ हजार ५४६ मतदार असुन
विधानसभेसाठी २७ लाख ८७ हजार ९४७ मतदार आहेत.
दुसरीकडे जिल्हा प्रशासन निवडणुकीसाठी सज्ज झाले आहे.

 

 

 

याबाबत सविस्तर वृत्त असेे आहे की महाराष्ट्रासह नांदेड जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या महत्त्वपूर्ण टप्प्याची सुरूवात आज पासून झाली आहे. नऊ विधानसभेसाठी १६५ उमेदवार मैदानात आहेत. तर नांदेड जिल्ह्यात याचवेळी होणाऱ्या लोकसभा

पोटनिवडणुकीसाठी १९ उमेदवार रिंगणात आहेत. १४ दिवस प्रचारासाठी मिळणार असून २० नोव्हेंबरला मतदान तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे पुढच्या रणधुमाळीत

 

 

उमेदवारांपासून ते सामान्य मतदारांपर्यंत सर्वांनीच आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे. तसेच भयमुक्त व पारदर्शी वातावरणात मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

 

 

निवडणूक प्रक्रियेतील आपल्या दुसऱ्या पत्रकार परिषदेत मोठ्यासंख्येने तरुणांनी मतदार नोंदणी प्रक्रियेत सहभाग नोंदविल्याबद्दल त्यांनी त्यांचे कौतुक केले. तसेच येणाऱ्या २० नोव्हेंबरला आपल्या भविष्याचा निर्णय घेतांना कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, असेही त्यांनी सांगितले.

६ मतदारसंघामध्ये एकाचवेळी लोकसभा व विधानसभेसाठी मतदान करावे लागणार आहे. अवघ्या काही सेकंदामध्ये ही प्रक्रिया पार पाडली जाईल. त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ व लागणाऱ्या मतदान यंत्रणांची उपलब्धता विपूल प्रमाणात असल्याची माहितीही त्यांनी दिली. सोबतच दिवस छोटा असल्यामुळे सर्व मतदान केंद्रावर सायंकाळीच दिवाबत्तीची व्यवस्था करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.