देगलूर प्रतिनिधी दि.१० :- देगलूर -बिलोली विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मतदारसंघातील दिव्यांग तसेच वय वर्षे ८५ वरील असणा-या मतदारा करिता १५ पथके कर्मचारी निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी दि.०९ नोव्हेंबर शनिवार रोजी सकाळी निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती क्रांती डोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली पथके रवाना करण्यात आलेआहेत.
देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघात ८३ गावातील ८५ वर्षावरील पुरूष-४०, महिला – ८१ तर दिव्यांग पुरूष – १९ महिला – १४ असे एकूण पुरूष ५९, महिला ९५ असे एकूण- १५४ मतदार यात (८५ वर्षावरील १२१+३३ दिव्यांग) साठी एकूण १५ पथके नेमण्यात आले. देगलूर हून यात निवडणूक पथक ,शस्त्रधारी पोलीस कर्मचारी,छायाचित्रण करणा-या पथकासह दि.०९नोव्हेंबर शनिवार रोजी सकाळी रवाना करण्यात आले.
यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार भरत सूर्यवंशी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा बिलोली तहसीलदार गजानन शिंदे, गृह मतदान पथक प्रमुख तथा नायब तहसीलदार बालाजी मिठेवाड, आचारसंहिता पथक प्रमुख तथा गटविकास अधिकारी शेखर देशमुख, नायब तहसीलदार गिरीष सर्कलवाड,
ज्येष्ठ शिक्षणविस्तार अधिकारी हम्मीद दौलताबादी, माधव आंबुलगेकर आदींसह झोनल अधिकारी, बिएलओ, मंडळ अधिकारी, तलाठी उपस्थित होते. अशी माहिती मिडिया कक्ष नोडल अधिकारी श्रीमती सुषमा मोहोड व साहाय्यक प्रा. महेश कुलकर्णी व विठ्ठल चंदनकर, विजय शिकारे यांनी सांगितले.