देगलूर दि.२६ :- येथील अडत व्यापारी शिक्षण संस्था संचलित देगलुर महाविद्यालय देगलुर येथे वैद्यकीय व अभियांत्रिकी पूर्व प्रवेश परिक्षा वर्ग चालविले जातात.आगामी वर्ग प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश परिक्षा दि २९डिसेबंर रोजी घेण्यात येत आहे
देगलूर महाविद्यालय हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गरज विचारात घेऊन १९६३ मध्ये स्थापन करण्यात
आले,तेव्हापासून आजतागायत सामाजिक बांधिलकीतून संस्थेतील पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शक विचारातून नवनवीन उपक्रम महाविद्यालयात राबविण्यात येतात.त्यातील एक उपक्रम कोटा (राजस्थान) येथील तज्ञ शिक्षकांच्या टीम मार्फत मागील वर्षांपासून [JEE & NEET ]अभियांत्रिकी,वैद्यकीय प्रवेश परिक्षेचे नियमीत वर्ग घेण्यात येत आहेत. शैक्षणिक वर्ष २०२५~२६ साठीचीनवीन बॅच येत्या १५मार्च पासून सुरुवात होणार आहे.
त्या अनुषंगानेच महाविद्यालयात चालत असलेले विविध उपक्रमाबद्दल माहीती देण्यासाठी विज्ञान शाखेचे शिक्षक विविध शाळेला भेट देऊन दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व देगलुर महाविद्यालय देगलूर येथे मार्चमध्ये JEE/ NEET तसेच जून मध्ये अकरावीत प्रवेश घेण्यासंदर्भात आवाहन करण्यात आले.
या प्रवेशाच्या अनुषंगानेJEE/NEET प्रवेश पूर्व परिक्षा २९डिसेंबर २०२४रोजी देगलुर महाविद्यालय देगलूर येथे सकाळी ठीक ११वा. आयोजित करण्यात आली आहे.
या परीक्षेत ८०%पेक्षा जास्त मार्क्स घेणाऱ्यां विद्यार्थ्यांस १००% ‘शिकवणी फीस’ माफ असेल अशी माहीती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मोहन खताळ यांनी दिली आहे. तरी दहावीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी (JEE/ NEET ) वर्गाचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील
बेंबरेकर , उपाध्यक्ष जनार्दन चिद्रावार,सचिव डाॅ कर्मवीर उनग्रतवार सहसचिव राजकुमार महाजन,कोषाध्यक्ष विलास तोटावार कार्यकारिणी सदस्य .देवेंद्रशेठ मोतेवार, सूर्यकांतशेठ नारलावार, नारायणरावमैलागिरे ,.चंद्रकांत नारलावार,.गंगाधरराव जोशी,रविंद्र द्याडे ,गुरुराज चिद्रावार,विजय उनग्रतवार महाविद्यालय चे प्राचार्य डॉ.मोहन खताळ,उपप्राचार्य डॉ.अनिल चिद्रावार उपप्राचार्य (क.म.)डाॅ. शेरीकर व्हि.जी.(विज्ञान)उपप्राचार्य प्रा.चमकुडे एम. एम.(कला,वाणिज्य) पर्यवेक्षक एस.एन पाटील यांनी केले आहे.