महिला सुरक्षेसाठी नेहमी आम्ही कटिबध..पोलीस निरीक्षक श्री मारोती मुंडे
देगलुर प्रतिनिधी दि.२४ :- देगलूर येथे नुकतेच सय्यद कम्प्युटर येथे लोकशाही महिला आघाडी पत्रकार संघ नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली.कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती देगलूर पोलीस स्टेशन चे कर्तव्यदक्ष श्री मारोती मुंडे हे उपस्थित होते.
लोकशाही महिला आघाडी पत्रकार संघ तालुकाध्यक्षपदी दिपाली संजय पाटील ,उपाध्यक्षपदी संगीता विशाल कदम,कार्याध्यक्ष पदी शेख रजिया मैनोदीन, कोशाध्यक्ष पदी दीपाली कालिदास बिरादार,सचिवपदी शितल विजयकुमार पाटील,सदस्य पदी छाया मारोती कावटवार यांची निवड करण्यात आली.
पोलीस निरीक्षक श्री मारोती मुंडे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे सत्कार केले तसेच कौतुक ही केले की महिला आघाडी पत्रकार संघ आहे, जेणेकरून महिलांचे प्रश्न तसेच अडचणी ते मांडू शकतील.
या कार्यक्रमात लोकशाही पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा.सय्यद आरिफ सर,संचालक सय्यद कम्प्युटर, तालुकाध्यक्ष श्री सतीश क्यादारे सर, मुखेड तालुकाध्यक्ष जयसिंग कांबळे सर,उपाध्यक्ष श्री मदने सर हे उपस्थित होते.