देगलूर दि.२४ :- देगलूर येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारका जवळ सर्वपक्षीय शिवप्रेमी कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच पार पडली त्यात यावर्षीच्या शिवजयंती उत्सव समितीची नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यामध्ये समितीचे अध्यक्षपदी देगावचे माजी सरपंच मंगल विनायकराव पाटील देगावकर यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
यावर्षी शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात व विविध सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच ,कृषी विषयक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी विविध समित्यांचे गठन लवकरच केले जाणार आहे. समितीच्या इतर
कार्यकारणी मध्ये उपाध्यक्षपदी जेजेराव पा .शिंदे ,सचिवपदी राजू पा मलकापूरकर, कार्याध्यक्षपदी कैलास येसगे, डॉ. सुनील जाधव तर स्वागतअध्यक्षपदी बाबू पाटील सुगावकर यांची निवड करण्यात आली .
इतर कार्यकारणीत कोषाध्यक्षपदी भाजपाचे शहराध्यक्ष प्रशांत दासरवार ,संघटक म्हणून जयपाल कांबळे ,शेख अस्लम, सहसचिव म्हणून सदाशिव बंडू शिंदे ,रमेश पा.वनाळीकर, राजू देशमुख ,सुलतान कुरेशी ,गजानन शिंदे, जयदीप वरखिंडे ,बालाजी पाटील कुशावाडीकर ,रुपेश पाटील पांडुरंग थडके, संदीप शिंदे आदींची यामध्ये निवड जाहीर करण्यात आली. नूतन कार्यकारिणीचा यावेळी सत्कार करण्यात आला.