देगलूर प्रतिनिधी, दि ०६:- आदर्श बहुउद्देशिय सामाजिक संस्था संचलित फैज ईंग्लिश स्कुल देगलुर च्या प्रांगणात उपजिल्हा रूग्णालय देगलुर च्या (RBSK Team) क्रमांक ३ कडून शाळेतील सर्वच उपस्थित एकुण ३०२ विद्यार्थ्यां पैकी मुले १७८ व १२४ मुलींची संपुर्ण आरोग्य तपासणी
नुकतीच करण्यात आली असुन या पैकी १६ विद्यार्थी ६ मुले व १० मुलींना दातांच्या अडचनी असल्याने त्यांना नियमित पुढील उपचाराकरीता उपजिल्हा रूग्णालयात बोलावण्यात आले आहे. या टीम चे प्रमुख डॉ.शेख नजीब अहेमद यांनी सर्व रोग निदान,डॉ.मोना ओह्वाळ दंत आरोग्य तपासणी,डॉ.तबस्सुम
परकोटे,सर्व रोग निदान डॉ. धोत्रे सर्व रोग निदान,याहया खॉन, मारोती बोडके यांनी रक्त गट तपासणी केली.यानंतर संस्थेच्या वतीने सर्व उपस्थित डॉक्टरांचे यथोचित सत्कार करन्यात आले.या प्रसंगी देगलूरच्या जनतेस सौभाग्याने लाभलेले उपजिल्हा रूग्णालय वैद्यकिय अधिक्षक मा.श्री नरेशजी देवनीकर सरांचे विषेश आभार मानले यावेळी
संस्थेचे सचिव सय्यद मोहियोद्दीन प्राचार्य सय्यद फैजुल्ला सर,उप प्राचार्या तबस्सुम फातेमा, उद्योगपती शेख रहिम हाजी ज्वेलर्स,व पालक वर्ग उपस्थित होते.या सर्व रोग निदान कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी सर्वच शिक्षक व कर्मचारी वर्ग यांनी विशेष परिश्रम घेतले.