देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण मंडळ,हैदराबाद यांचा श्रावणी कार्यक्रम ९ ऑगस्ट रोजी.

 

हैदराबाद प्रतिनिधी – देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण मंडळ, हैदराबाद यांच्या वतीने यावर्षीचा पारंपरिक श्रावणी कार्यक्रम शनिवार, ९ ऑगस्ट २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे.

 

हा कार्यक्रम लिंगमपल्ली येथील हनुमान मंदिरात (पटेल भवनच्या शेजारील गल्लीत) सकाळी ७:३० वाजता सुरू होणार आहे.

 

कार्यक्रमासाठी नोंदणी शुल्क नाही, मात्र नोंदणीची अंतिम तारीख ७ ऑगस्ट २०२५ आहे. अधिकाधिक बंधूंनी या कार्यक्रमात सहभागी होऊन श्रावणी विधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

 

सहभागींनी कार्यक्रमस्थळी १५ मिनिटे आधी उपस्थित राहावे. तसेच पळी, पंचपात्र, आसन आणि धोतर/सवळे सोबत आणणे आवश्यक आहे.

 

कार्यक्रमाचे वेळापत्रक: ७.३० ते ८.०० – चहा ८.०० ते १०.३० – श्रावणी विधी १०.३० ते ११.०० – अल्पोपहार अधिक माहितीसाठी संपर्क: मदन क्षीरसागर–9948369187 प्रदीप मंगरूळकर–8686892843 सर्वोत्तम जोशी–8328165253

 

सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचा सन्मान राखणारा हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आयोजकांचे आवाहन आहे.