देगलूर प्रतिनिधी,दि२९:-देगलूर शहरातील व तालुक्यातील गुटखाबंदीसाठी एक युवक आक्रमक झाला असून निपाणी सावरगाव ते देगलूर पर्यंत गुटख्याच्या शर्ट व पॅन्ट घालुन पायी चालत येऊन देगलूर शहरातील व तालुक्यातील गुटखा बंदी करण्यासाठी त्यानें अनोखे आंदोलन सुरू केले आहे.
दि. २८.०७.२०२५ रोजी मा.उप जिल्हाधिकारी साहेब, उप जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या कार्यालयासमोर आकाश दत्ता पाटील कोकणे सामाजिक कार्यकर्ता हा युवक आमरण उपोषणास बसला आहे.
या युवकाने यापूर्वी देखील दि.१९.०६.२०२५ रोजी गुटखा बंदी करणेसाठी दिलेला अर्ज दिला होता त्यानंतर
दि.०३.०७.२०२५ रोजी गुटखा बंद करणेसाठी अर्ज दिला होता.पन वांरवार या युवकाच्या मागणीला वरिष्ठांकडून केराची टोपली दाखविली गेली.
महाराष्ट्र राज्यात गुटखा बंदी असतांना कर्नाटक व तेलंगाना या राज्यातुन मोठ्या प्रमाणात गुटखा आणून विक्री केली जाते. गुटखा बंद करण्यासाठी वांरवार निवेदन देवून सुद्धा अद्याप पर्यंत कसल्याच प्रकारची गुटखा बंदी करण्यात आली नाही या गुटखा विक्री करणा-याला दुकानदाराला, पान टपरी वाल्यांना गुटखा पुरविणा-या डीलर ला लवकरात लवकर शोधून त्यांच्या कायादेशीर कार्यवाही करण्यासाठी
त्यासाठी नाईलाजास्तव वरील मागणीसाठी मी मो. नि. सावरगाव ते देगलूर पर्यंत गुटख्याच्या शर्ट व पंन्ट घालून पायी चालत येऊन दि.२८.०७.२०२५ रोजी पासून मा.उप जिल्हाधिकारी साहेब, उप जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसलो आहे असे उपोषण कर्त्याचे म्हणणं आहे.
त्याच्या या अनोख्या आंदोलनाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे व सोशल मीडियावर सुद्धा हा व्हायरल झाला आहे.
यावर जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन, व अन्न व औषध प्रशासन काय भूमिका घेतात हे महत्त्वाचे आहे.