पोस्टे मरखेल येथे अवैध गुटखा वाहतूक प्रकरण उघडकीस – ७,३६,४०० रुपये किमतीचा गुटखा जप्त
देगलूर प्रतिनिधी,(दि. २८ जुलै २०२५) – स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांच्या विशेष ऑपरेशन दरम्यान पोस्टे मरखेल पोलीस ठाणे हद्दीत अवैध गुटख्याची मोठ्या प्रमाणावर वाहतूक करत असलेले दोन इसम पोलिसांनी अटक करून, त्यांच्या ताब्यातून तब्बल ७,३६,४००/- रुपये किमतीचा प्रतिबंधित तंबाखूजन्य गुटखा जप्त केला.
याबाबत सविस्तर वृत्त असे आहे की,दि.२७जुलै २०२५ रोजी संध्याकाळी ६:५० वाजता, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, एक इसम पांढऱ्या रंगाची टोयोटा कारमधून अवैध गुटख्याची वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या
आधारे, पोलिसांनी तत्काळ कारवाई करत पो.कॉ/२८६४ पांडुरंग नारायण वाघमारे, रा. पोस्टे मरखेल या ठिकाणी कार अडवली. तपासणी दरम्यान, गाडीतून विविध कंपन्यांच्या तंबाखूजन्य गुटख्याचे पॅकेट्स सापडले.
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल:
पांढऱ्या रंगाची टोयोटा कार (किंमत – ₹७,००,०००)
गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ (किंमत – ₹३६,४००)
एकूण मुद्देमाल – ₹७,३६,४००
अटक आरोपी: बबन पिराजी पुल्लेवाड, वय ३२ वर्षे प्रकाश पांडुरंग कोकणे, वय ३० वर्षे दोघे रा.हंगरगा ता.औराद जि.बीदर.
या कारवाईचे मार्गदर्शन मा. श्री. अभिनव कुमार (IPS), पोलीस अधीक्षक, नांदेड तसेच श्री. सूरज गुरव (अप्पर पोलीस अधीक्षक, नांदेड) श्रीमती. अर्चना पाटील, अपर पोलीस अधिक्षक, भोकर श्री संकेत गोसावी, उपविभागीय पोलीस अधीकारी उपविभाग देगलुर यांचे मार्गदर्शनाखाली
श्री रवि हुंडेकर, सपोनि ने. पोस्टे मरखेल श्री विलास पवार, पोउपनि ने. पोस्टे मरखेल पोकॉ/2864 पांडुरंग नारायण यंगाले, पोस्टे मरखेल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
याप्रकरणी पोस्टे मरखेल पोलीस ठाण्यात गु.र.क्र. १८६/२०२५, भा.दं.वि. कलम २२३, २७४, २७५, १२३, भा.सा.का. २०२३ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
नांदेड पोलीस प्रशासनाचे आवाहन:
गुटखा व प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन आरोग्यास अत्यंत घातक आहे. अशा अवैध व्यवहारांना आळा घालण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले आहे.