नांदेड – माजी खासदार खतगावकर यांच्या पत्नी स्नेहलता ताई यांचे निधन.

 

नांदेड प्रतिनिधी, दि. १ ऑगस्ट :- NDC बँकेचे अध्यक्ष व माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या पत्नी सौ. स्नेहलता ताई भास्करराव पाटील खतगावकर यांचे आज दुपारी ३ वाजता अल्पशः आजाराने निधन झाले. त्या ७५ वर्षांच्या होत्या.

 

 

त्यांच्या पार्थिवावर उद्या, दिनांक २ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० वाजता, नांदेड येथील गोवर्धन घाट स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

 

 

स्नेहलता ताई या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व खासदार श्री. अशोक चव्हाण यांच्या मोठ्या बहिणी होत्या. त्यांच्या निधनाने चव्हाण व खतगावकर कुटुंबियांवर शोककळा पसरली असून नांदेड जिल्ह्यातून विविध स्तरांतील लोकांकडून शोक व्यक्त केला जात आहे.

 

 

स्नेहलता ताई यांनी आपल्या शांत, संयमी आणि कुटुंबप्रेमी स्वभावामुळे समाजात विशेष स्थान मिळवले होते. त्यांच्या निधनामुळे सामाजिक, राजकीय व कुटुंबीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.

साप्ताहिक महिमा खादीच्या संपूर्ण परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.