साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयात अभिवादन.

 

 

नांदेड, दि. २ ऑगस्ट (प्रतिनिधी):
साहित्य, सामाजिक जागृती आणि श्रमिक वर्गाच्या हक्कासाठी झगडणारे थोर क्रांतिकारक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती दिनांक १ ऑगस्ट २०२५ रोजी नांदेड येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात साजरी करण्यात आली.

 

 

या वेळी नांदेडचे पोलीस अधीक्षक मा. श्री. अभिनाश कुमार यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास श्री. रियाज शेख (सहाय्यक पोलीस निरीक्षक), श्री. जे. ई.

 

 

गायकवाड (पोलीस उपनिरीक्षक तथा जनसंपर्क अधिकारी) तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयातील सर्व विभागांचे अधिकारी व पोलीस अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

या अभिवादन कार्यक्रमाचे उत्तम नियोजन ग्रे. पोउपनि श्री. सुर्यभान कागणे, पो.कों. मारोती कांबळे व नरेंद्र राठोड यांनी केले.

कार्यक्रमात अण्णाभाऊ साठे यांच्या प्रेरणादायी कार्याचा उजाळा देण्यात आला आणि त्यांच्या विचारांना पोलीस विभागाने मानवंदना अर्पण केली.

 

सदर उपक्रमातून सामाजिक समतेचा आणि न्यायाचा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला.