नांदेड (प्रतिनिधी):दि.०२:-पोलीस अधीक्षक मा. श्री. अविनाश कुमार यांच्या पुढाकाराने नांदेड शहरात सुरू करण्यात आलेल्या ‘सिटी स्ट्रिट सेफ्टी ड्राईव्ह’ अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यांविरोधात जोरदार मोहीम राबवण्यात येत आहे.
दिनांक ३१ जुलै २०२५ रोजी या अभियानात शहरातील विविध पोलीस स्टेशनच्या पथकांनी खालीलप्रमाणे कार्यवाही केली:
विमानतळ पोलीस स्टेशन:
सांगवी परिसरात दोन इसम सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून गोंधळ करताना आढळून आले. त्यांच्याविरुद्ध कलम 110/117 अंतर्गत कारवाई करण्यात आली. परिसरातील दारू विक्रीचे ठिकाणे व हॉटेल्सचीही तपासणी करण्यात आली.
वजिराबाद पोलीस स्टेशन:
पथकाने दोन विनानंबर मोटारसायकली जप्त केल्या. संबंधितांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करत 1000/- रुपये दंड आकारण्यात आला.
भाग्यनगर पोलीस स्टेशन:
आशोकनगर नौसरामध्ये सहा इसम मद्यप्राशन करून सार्वजनिक शांतता भंग करताना आढळले. त्यांच्यावरही कलम 110/117 अंतर्गत कारवाई झाली.
दामिनी पथकाची कारवाई:
शिवाजीनगर परिसरात एका इसमाने आरडाओरड करून गोंधळ घातल्याने त्याच्यावरही कायदेशीर कारवाई करण्यात आली.
पोलीस अधीक्षक मा. श्री. अविनाश कुमार यांचा इशारा:
“सार्वजनिक ठिकाणी दारू पिणे, गोंधळ घालणे किंवा दारू पिण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे हे गुन्हे असून, अशा व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे.”
‘सिटी स्ट्रिट सेफ्टी ड्राईव्ह’ अंतर्गत शहरात कायद्याचे कडक अंमलबजावणी सुरू असून अशा मोहिमा भविष्यातही सुरूच राहणार आहेत.