प्रतिनिधी:-ज्ञानेश्वर कागणे, दि २७ : मौजे शिरपूर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथील शेतकरी श्री अनिल आबाजी पाटील यांनी सोलापूर जिल्हाधिकारी यांना स्वतःच्या मालकीची गट नंबर १८१/४यामध्ये दोन एकर क्षेत्रावर गांजा लागवडीस परवानगी मिळावी यासाठी निवेदन दिले आहे.त्यांनी सदर अर्जामध्ये मी शेतकरी असून कोणतेही पीक केले तरी शासनाच्या हमीभाव मिळत नसल्याचे कारण समोर करून शेती ही तोट्यात करावी लागत आहे शेतमालाला कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे शेती करणे कठीण झाले आहे,मशागतीसाठी केलेला खर्च देखील मिळत नाही तसेच एखाद्या साखर कारखान्याला गाळप करण्यासाठी ऊस पीक दिले असता त्याचे बिल देखील लवकर मिळत नाही त्यामुळे गांजा पिकाला चांगला भाव असल्यामुळे मला माझ्या शेती मध्ये दोन एकर क्षेत्रावर गांजा पीक लागवड करण्याची परवानगी देण्यात यावी असे निवेदनात नमूद केले आहे.त्यांनी सदर निवेदनात असेही नमूद केले आहे की दिनांक १५/०९/२०१९ पर्यंत प्रशासनाने लेखी परवानगी दिली तर ठीक नसता, सदरील दिनांक १६/०९/२०१९ पासुन परवानगी न दिल्यास शासनाची परवानगी असल्याचे गृहीत धरून आपण सदरील दोन एकर क्षेत्रावर गांजा पिकाची लागवड करणार आहे माझ्यावर गुन्हा दाखल झाला तर त्यास आपले प्रशासन जबाबदार असल्याचा ठोक इशाराच तरुण शेतकऱ्याने दिल्याने समाजामध्ये एक प्रकारचा सरकार बद्दल असलेला रोष बघायला मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.