“खडकीत ५ मजली बेकायदेशीर इमारत! प्रशासनाची डोळेझाक उघड”

 

पूणे/खडकी,दि.१२:- खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत अनधिकृत बांधकामांचा उच्छाद वाढला असून, अनेक ठिकाणी कोणत्याही परवानगीशिवाय इमारती बांधल्या जात

 

आहेत. विशेष म्हणजे, खडकी बाजारातील राजघराण्याच्या समोरच ६२ नवा बाजार येथे चक्क ५ मजली इमारतीचे बांधकाम सुरू असून, हे सर्व काम बोर्ड प्रशासनाच्या नजरेसमोर होत आहे.

 

 

मिळालेल्या माहितीनुसार, या बांधकामासाठी कोणतीही कायदेशीर परवानगी देण्यात आलेली नाही. कॅन्टोन्मेंट ॲक्टनुसार पाच मजली बांधकामासाठी परवानगी मिळत

 

 

नाही, तरीही संबंधित ठिकाणी जोरदार काम सुरू आहे. याबाबत माहितीच्या अधिकारातून उघड झाले आहे की हे बांधकाम संपूर्णपणे अनधिकृत आहे.

 

 

स्थानिकांचा आरोप आहे की, खडकीतील काही ‘हस्तक’ मंडळी बोर्डातील अधिकाऱ्यांशी संगनमत करून अशा बेकायदेशीर बांधकामांना संरक्षण देत आहेत. त्यामुळेच

 

बाजारातील अशा उंच इमारतींवर कारवाई न होता, केवळ अनधिकृत हातगाड्या व छोट्या दुकानांवरच कारवाई केली जात आहे.

 

स्थानिकांचा सवाल

“लहान व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचे धाडस प्रशासन दाखवते, मग पाच मजली बेकायदेशीर इमारतीवर कारवाई का होत नाही?” असा सवाल खडकीकरांनी उपस्थित केला आहे.

 

अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया

 “खडकी बाजारातील ६२ नवा बाजार येथील बांधकामाची कोणतीही माहिती माझ्याकडे नाही. या बांधकामासाठी परवानगी दिली आहे का, याची मी चौकशी करून सांगतो.”

— विकास सिंग, साहाय्यक अभियंता