तूर कापणी चे मशीनचा पंखा लागून तरुणाचा मृत्यू

प्रतिनिधी सीएस कागणे दि. २७ ऑगस्ट अतिशय दुःखद घटना मांडवा तालुका जिल्हा वर्धा येथील बंडोजी वंजारी यांचा काल  दिनांक २६ ऑगस्ट रोजी शेतामध्ये तुर छाटणी करीत असताना तूर कटर मशीन लागल्याने त्याच्या शेतामध्येच मृत्यू झाला आहे या दुखत घटनेमुळे सर्वत्र गावकरी हळहळ व्यक्त होत आहे हे घटना तुर कटरने कापत असताना मशीन चा पंखा तुटून गुप्तांगावर लागल्याने सदर इसमाचा मृत्यू झाला आहे सर्व  शेतकरी बांधवांना गावकऱ्यांची आग्रहाची विनंती आहे की शेतामध्ये तूर मशीन ने कापत असताना सावधगिरी बाळगावी जेणे करून असे अपघात पुन्हा घडणार नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *