देगलुर प्रतिनिधी ,दि २७ : देगलूर शहरातील प्रभाग क्रमांक ११ व १२ मधील रिकाम्या प्लॉटधारकामुळे तेथील नागरिकांची खुपच पंचाईत होत आहे सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे पाणी साचून सर्वत्र चिखल व घाण तयार होत आहे. त्यात डुकरें, साप,उंदीर इत्यादी जलचर व विषारी प्राण्याचे वास्तव्य वाढल्यामुळे पादचारी लोकांना याचा खूप त्रास सहन करावा लागत आहे.
या प्रभाग क्रमांकातील रिकाम्या प्लॉट मध्ये पावसाचे पाणी सर्वात जास्त साचून असते त्यामुळे सर्वत्र डासांचा उपद्रव माजला आहे त्यामुळे कॉलरा टायफाईड डेंगू असे विविध प्रकारचे आजार या भागांमध्ये वाढत आहेत तेथील नागरिक आरोग्याच्या काळजीपोटी चिंताग्रस्त आहेत संबंधित नगरसेवक नगराध्यक्ष आणि लोकप्रतिनिधी यांनी आपलं लक्ष घालून त्या प्लॉट धारकांना मुरुम भर टाकण्यास सांगावे व वारंवार स्वच्छता बाळगावी तसे नगर परिषदेतर्फे परिपत्रकच काढण्यात यावे, वेळोवेळी तक्रार करून पण ते प्लॉट धारक आपल्या प्लॉटमध्ये भरणा टाकत नाहीत.
त्या भागातील सर्व नागरिकांचे म्हणणे आहे की या प्लॉट धारकांना सांगून लोकप्रतिनिधींनी त्या भागातील नागरिकांना सहकार्य करावे त्यामुळे तेथील नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यास सहकार्य होईल. असे आवाहन या भागातील नागरिक करत आहेत.