देगलूर शहरात मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी.

देगलूर प्रतिनिधि दि.२७ : शहरात विटकरी रंगाची गाय सध्या लोकांना मारत आहे. नवीन सराफा भागात काल दिनांक २६/८/२१ रोजी दोन व्यक्तींचे हात मोडल्याची चर्चा आहे.
सदरील गायीच्या तोंडातून फेस येत आहे- (पागल कुत्रा चावल्यामूळे) या गायीचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचे देखील बोलले जात आहे. एकंदरीतच कुत्रे देखील शहरांमध्ये पिसाळलेले आहेत असे दिसून येते. गायीची उंची व जाडी दोन्हीही कमी आहे.
सदरील गायीचे मोकाट फिरने धोकादायक बनले असून उपचार व बंदोबस्त दोन्ही बाब आवश्यक झाले आहे. तरी या बाबतीत नगरपालिका प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून गायी  वर उपचार व गायीकडून नागरिकांची सुरक्षा करावी व कायमस्वरूपी तीच्या  चाऱ्याची, व निवार्‍याची. सोय करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

नागरिकांना सावध करण्यासाठी, व गायीचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी. म्हणून हा संदेश सोशल मीडियाच्या माध्यमातून पण लोकांपर्यंत पोहचविला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *