कुंडलवाडी रुपेश साठे दि ०१ : ठाणे महानगर पालिकेच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती.कल्पिता पिंपळे यांनी आपले कर्तव्य बजावत असताना एका माथेफिरू कडून त्यांच्यावर हल्ला झाला व यात त्यांची हाताची बोटे कापली गेली,तसेच डोक्यास देखील मोठी दुखापत झाली आहे. श्रीमती.कल्पिता पिंपळे यांनी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावणाऱ्या एका महिला अधिकाऱ्यावर झालेला हा भ्याड हल्ला अत्यंत संतापजनक आहे. गुन्हेगारी प्रवृतीचे लोक जेंव्हा कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांवर हल्ले करतात,तेंव्हा अश्या प्रकारच्या भ्याड हल्ल्याने केवळ हल्ला झालेला अधिकारीच न्हवे तर संपूर्ण प्रशासनाचे मनोधैर्य खच्ची होते त्यामुळे अश्या प्रकारच्या हल्ल्याचा संघटित निषेध करणे आणि हल्लेखोरांवर कठोर कारवाई करणे हाच यावरील उपाय आहे. त्यामुळे या घटनेचा निषेध म्हणून आज दिनांक ३१ ऑगस्ट २०२१ रोजी कुंडलवाडी नगरपरिषद संपूर्ण प्रशासकीय कामकाज कडकडीत रित्या बंद ठेवण्यात आले आहे . यावेळी कुंडलवाडी नगर परिषद मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे,गंगाधर पत्की संघटना अध्यक्ष व न.प कर्मचारी यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी व तहसिलदार बिलोली यांना एका निवेदनाव्दारे मागणी करून जाहीर निषेध केले आहे.यावेळी कार्यालयीन अधीक्षक सुभाष निरावार,विश्वास लटपटे,विरसेन सिरसाट,प्रतिक माळवदे,राम पिचकेवार, बालाजी टोपाजी,मुंजाजी रेणगडे,हेमचंद्र वाघमारे,प्रकाश भोरे,शंकर जायेवार,मोहन कंपाळे,मारोती करपे,धोडींबा वाघमारे,महेंद्र वाघमारे,विजय वाघमारे,सय्यद माजीद,भरत काळे,शुभम ढिल्लोड व इतर कर्मचारी उपस्थित होते .