कुंडलवाडी– रुपेश साठे दि.०१ : कुंडलवाडी येथे गोल्ला गोलेवार समाजाचे वतीने खंडोबा मंदिर येथे गोकुळाष्टमी निमित्त महाप्रसादाचे कार्यक्रमआयोजित करण्यात आले होते.
या महाप्रसादाच्या कार्यक्रमाला बाबुराव चरकुलवार अध्यक्ष गोल्ला गोलेवार समाज संघटना बिलोली, संजय गंगाराम चरकुलवार, परमेश्वर गजलोड या उपस्थित मान्यवरांचा सत्कार समाजाच्या वतीने करण्यात आला तसेच समाजाच्या अडीअडचणी बाबतची चर्चा यावेळी समाज बांधवांनी रीतसर उपस्थित केले. याप्रसंगी विलास दिवशीकर जिल्हा उपाध्यक्ष, पिराजी येरमुलवार तालुका कार्याध्यक्ष, मकरंद मठ्ठमवार तालुका अध्यक्ष महिला प्रतिनिधी, शाखा अध्यक्ष गंगाधर सायन्ना जालावार, शाखा उपध्यक्ष पंढरी जंगीलवार, शिवाजी कोरेवार सचिव, इरेश मोतकेवार संघटक तथा गोकुळाष्टमी उपाध्यक्ष, मारुती जालावार, मल्लेश मोतकेवार, आबांना जालावर, सायन्ना मठ्ठमवार यासह आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थीत होते.