सोपान दंतुलवाड मरखेलकर (मदनूर) दि.०२ : तेलंगणा राज्य सरकारने सुमारे सतरा महिन्यानंतर शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला त्या अनुषंगाने कामारेड्डी जिल्ह्यातील सर्व शाळा एक तारखेपासून सुरू झाल्या. शाळा सुरू होत असल्याने विद्यार्थी व शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण होते कामारेडी जिल्ह्यातील मदनुर मंडळ मधील गोजेगाव येथे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना येथील ग्रामस्थांनी मास्क वाटप केले . या कार्यक्रमात विजयकुमार गोजेगावकर, आदि ग्रामस्त आणि शालेय विद्यार्थी उपस्थित होते या प्रसंगी मोठ्या संख्येने, सर्वांना मास्क बंधनकारक असल्यामुळे विद्यार्थ्यांची परिस्थिती लक्षात घेऊन, साथीच्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटाच्या प्रारंभापूर्वी काळजी म्हणून, आज गोजेगाव सरपंचांनी सर्व मुलींना मास्कचे वाटप केले.या प्रसंगी प्रत्येकाने करोनावर आपले मत व्यक्त केले.