कुंडलवाडी आरोग्य केंद्रास शेतकऱ्याकडून वाटर कुलर भेट.

कुंडलवाडी –रुपेश साठे,दि ०४ :  येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास कुंडलवाडी येथून काही अंतरावरील असलेल्या नाग्यापुर येथील शेतकरी संभाजी मारोतीराव कदम यांनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास थंड व गरम पिण्याच्या पाण्याची वाटर कुलर भेट देऊन आरोग्य केंद्रास येणाऱ्या रुग्णांना,आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना व तसेच प्रसूती झालेल्या मातांना गरम व थंड पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे.
सदरील वाटर कुलर संभाजी कदम यांनी स्वखुशीने देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. त्यांच्या तर्फे दिलेल्या वाटर कुलरचे कुंडलवाडी शहर व परिसरातील नागरिकांकडून कौतुक व अभिनंदन केले जात आहे.
याप्रसंगी प्रा.आ. केंद्राचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ.माहुरे, डॉ.नरेश बोधनकर,तालुका परवेक्षक बनसोडे, अंगत मुंडे,सावंत सिस्टर,अमेटवर यासह आदींनी त्यांचे आभार मानत अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *