कुंडलवाडी शहरातील व परिसरातील दिव्यांग वृध्द निराधार बांधवांनी दिव्यांग मित्र ॲपचा वापर करावा
कुंडलवाडी रुपेश साठे , दि ०३ : कुंडलवाडी येथील विठ्ठल साई मंदिरात दिव्यांग वृध्द निराधार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष :- चंपतराव डाकोरे (दिव्यांग वृध्द निराधार संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य) तर प्रमुख पाहून म्हणून बालाजी होनपारखे (तालुकाध्यक्ष बिलोली),संतोष नरवाडे (तालुका सचिव)राम गायकवाड,सावित्राताई समेटवार,शोभाताई झंपलकर उपस्थित होते.
यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले तर अध्यक्षीय भाषण कार्यक्रमाचे अध्यक्ष चंपतराव डाकोरे यांनी दिव्यांग वृध्द निराधार बांधवांना मार्गदर्शन करताना असे म्हणाले की,शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मुलमंत्र दिले आहेत.त्याचे आपल्या जीवनात बद्दल करण्यासाठी अंगीकारले पाहिजे असे म्हणाले पुढे बोलताना डाकोरे यांनी दिव्यांग वृध्द निराधार बांधवांच्या न्याय हक्कासाठी चाळीस योजना आहेत.त्यामुळे दिव्यांग वृध्द निराधार बांधवांनी संघटित राहुन आपल्याला असलेल्या योजनेचा लाभ मी मिळवून देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करीन असे प्रतिपादन केले आहे.
यावेळी दिव्यांग वृध्द निराधार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.