कंधार प्रतिनिधी~ दि.०४ : पुतळा उभारणीवरून पोलीस-ग्रामस्थांमध्ये राडा, घरात घुसून मारहाण केल्याचा आरोप
पोलीस-ग्रामस्थांमध्ये राडा, घरात घुसून मारहाण केल्याचा आरोप
कंधार तालुक्यातील गऊळ येथे पुतळा बसवण्याचा करणावरून पोलीस व ग्रामस्थांमध्ये प्रचंड राडा झालाय. कंधार तालुक्यातील गऊळ येथे ग्रामपंचायत च्या जागेवर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसण्याच्या कारणावरून पोलीस व ग्रामस्थ यांच्यात बाचाबाची होऊन प्रचंड राडा झालाय. या
पुतळ्याच्या जागेच्या वादावरून पोलीस प्रशासनाने गऊळ येथील पुरुष व महिला ग्रामस्थांना घरात घुसून मारहाण केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. कंधार तालुक्यामध्ये घडलेल्या या पुतळा प्रकरणावरून पोलीस व नागरिक यांच्यात वाद निर्माण होऊन पोलिसांकडून लाठी चार्ज करण्यात आलाय.त्यामुळे गावातील वातावरण बिघडले असून गावास छावणीचे रूप आले आहे.