मदनूरमध्ये हरिनाम गाथा पूजा संपन्न.

दंतुलवार सोपान मरखेलकर (मदनूर)   दि.०४ :  मदनूरमध्ये हरिनाम गाथा पूजा पूर्ण झाली. . कामरेड्डी जिल्ह्यातील मदनूर मंडळ येथील  स्थानिक मल्लेश्वर मंदिरात आज सकाळपासून हरिनाम भजन आणि गाथा, पूजा, आरती आणि महाप्रसादाचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर रात्री उशिरापर्यंत श्री संगयप्पा महाराज कांताळीकर यांच्या अध्यक्षतेखाली भजन, कीर्तन इत्यादींचा कार्यक्रम पूर्ण झाला. आणि या प्रसंगी या मंदिराचे मुख्य पुजारी श्री वेंकट महाराज आणि भाऊराव पाटील महाराज थडीहिपर्गेकर, मारोती महाराज लाडेगावकर, सोपान महाराज बादलगावकर, विठ्ठल महाराज कोडपगल, बाबू पाटील हंगारगेकर, बाबुराव कांतळीकर, विठ्ठलमामा महाराज मदनूरकर, एरकल बलराम महाराज  गोपाळ महाराज पांचाळ आदीच्या प्रयत्नांमुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *