मुखेड प्रतिनिधी~ज्ञानेश्वर कागणे हिब्बटकर दि.०५ :
मुखेड तालुक्यातील जाहूर व चांडोळा सर्कल मध्ये मागील तिन ते चार दिवसापासूनसतत अतिवृष्टी होत आहे पावससाने परिसरात अक्षरश थैमान घातला असुन त्यामुळे पिकांची प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे शेतकर्यांच्या मुखास आलेला घास पावसाने वाहून गेला आहे.
सततच्या पाउस पडत असल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे
शेतकऱ्यांना शेतात आलेली उडीद, मुग,सोयाफोन या सारखी पिके कापनीस आली असताना पाऊस होत असल्याने पिकाचे प्रचंड नुकसान होत आहे आदीच कोरोना सारख्य महामारीतुन कसाबसा सावरनारा शेतकरी या येनारया पिकांच्या आशेवर दिवस काढत होते पन निसर्गाचा होणरया कोपामुळे शेतकरी आधिकच चिंताग्रस्त झाल्याचे चित्र दिसत आहे.
शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शासनाने काढलेल्या प्रधानमंत्री फसल विमा योजनेचा सहारा घेन्यासाठी शेतकरी कंपनीच्या टोल फ्री नंबरवर नुकसानीची माहिती देन्यासाठी फोन लावून परेशान आहेत. अशा परीस्थितीत शेतकऱ्यांना शासनाने तात्कळ मदत करण्याची अपेक्षा शेतकरी करत आहेत.