■ मोती नदिवरून कारमध्ये तिन जन. वाहून गेले.
■ एकाला वाचविण्यात यश तर २ जन बेपत्ता.
मेथी जवळही एक जन वाहुन गेले.
■ पिकासह सर्वच शेतकऱ्यांचे भविष्यही वाहुन गेले.
मुखेड प्रतिनिधी~ ज्ञानेश्वर कागणे हिब्बटकर दि.०८ : मुखेड तालुक्यात पावसाचा रौद्रावतार पाहायला मिळाला असुन शहराच्या नजिक असलेल्या मोतीनदिवरून कार वाहुन गेली यातील तिघापैकी एकास वाचविन्यात यश तर दोघे पिता पुत्र वाहुन गेल्याची घटना घडली मुखेड तालुक्यातील कमळेवाडी येथील रहिवासी भगवान राठोड वय ६५ व त्यांचा मुलगा संदिप राठोड वय २८ हे त्यांच्यासोबत आणी त्याचा नोकर उध्दव देवकते याला घेउन इंडीगो कार एम. एच. २० डी.जे. ६९२५ या कार ने कमळेवाडी येथून पांडूर्णी मार्गे मुखेडकडे येत होते .सकाळी १०:४५ च्या सुमारास सदर कार मुखेडनजीक असलेल्या मोती नदिजवळ आली असता चालक संदिप राठोड यास पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज आला नसल्याने कार पाण्याच्या प्रवाहात वाहुन गेली. यात कारमधील उध्दव देवकते ने बाबळीच्या झाडाचा आसरा घेतल्याने तब्बल चार तास तो अडकून राहिला शेवटी सभापती लक्ष्मण पाटील खैरकेकर यांनी व गावातील नागरिकांनी प्रयत्न करुन त्यास वाचविले तर दोघाचे शोधकार्य सुरू आहे .दुसरीकडे तालुक्यातील मेथी येथील यादवराव जळबा हिवराळे
वय ५५ शेताला जात असते वेळी वाहुन गेले असुन त्याचा मृतदेह सापडलेला आहे.
वाहुन गेलेले भगवान राठोड हे माजी आमदार किशनराव राठोड याचा मुलगा तर संदिप राठोड हे नातु आहेत तर विद्धमान आमदार तुषार राठोड यांचे चुलत भाऊ, आणी पुतण्या आहेत तब्बल चार तासाच्या प्रयत्ना नंतर आडकलेली कार बाहेर काढण्यात आली
यावेळी उपस्थित भाजपा तालुका अध्यक्ष डॉ विरभद्र हिमगीरे माजी नगराध्यक्ष अनिल जाजु, जिल्हा उपाध्यक्ष अशोक गजलवाड,भाजपा शहर प्रमुख किशोरसिंह चौहान प्रहार शहर प्रमुख साईनाथ बोईनवाड,पोलीस पाटील माधवराव टाकळे,नगरसेवक मैनोद्दिन शेख यांच्या सह सर्व पक्षीय पदाधिकारी,कार्यकर्ते, आणि शहरातील मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.
पाउस सकाळपासून आपला रौद्रावतार धारण केल्याने शहरातील फुले नगर, वाल्मिकी नगर, भागातील नागरिकांना हलवन्यात आले प्रशासनाच्या वतीने आमदार तुशार राठोड,तहसीलदार काशीनाथ पाटील, गटविकास अधिकारी तुकाराम भालके,मुख्याअधीकारी विजयकुमार चव्हाण हे घटनास्थळी दाखल झाले होते तर शिवशेना शहर प्रमुख नागनाथ लोखंडे ,प्रहारचे शिवानंद बंडे यांनी मदतकार्यास सहकार्य केले
मुखेड तालुक्यातील सावरगाववाडी जवळील तळे फुटुन शेतात पाणी शिरल्याने शेतखर्याचे मोठे नुकसान झाले आहे घटनेचे गांभीर्य पाहता जिल्ह्याधिकारी डॉ विपीन ईटनकर घटनास्थळी दाखल झाले होते. तर जवळच्या पूलाजवळ वाहुन गेलेली कार सापडली असुन जेसीबीच्या सहाय्याने कार बाहेर काढण्यात आली आहे.
तालुक्यातील येवती,चांडोळा,जाहूर,बार्हाळी,मुक्रामाबाद,जांब, सावरगाव, एकलारा,होनवडज,हंगरगा,या सर्वच भागात मोठा पाउस पडल्याने शेतकरी हवालदिल झाला असून पंचनाम्यात वेळ न घालवता तात्काळ मदत जाहीर करावी व शंभर टक्के पिकवीमा मंजुर करावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवशंकर पाटील कलंबरकर यांनी केली आहे.