गणेशपूर येथे शेतकऱ्यावर अस्वलांचा जीवघेणा हल्ला.

गणेशपूर येथे एका शेतकऱ्यावर अस्वलांचा जीवघेणे हल्ला
किनवट प्रतिनिधी, सीएस कागणे  दिनांक ९ सप्टेंबर  :  किनवट येथून आठ किमी अंतरावर असलेल्या गणेशपुर दिनांक ५ सप्टेंबर रोजी सकाळी शेतकरी दत्ता वानखेडे हे हे आपल्या शेतात काम करत असताना त्यावेळी अचानक चार अस्वल समुहाने आले त्यापैकी दोघा ने दत्ता वानखेडेवर जीवघेणे हल्ला केला असे जखमी दत्ता वानखेडे त्यांनी सांगितले डोक्यावर चिर पडली तोंडाचा जबडा अस्वलाने लचका मारून तोडला तरी दत्ता वानखेडे  यांना गोकुंदा येथे उपजिल्हा रुग्णालय उपचारास आणण्यात आले शेतकऱ्याला अस्वलाने जास्त जखमी केल्यामुळे उपजिल्हा रुग्णालय येथून नांदेड रुग्णालयात नेण्यात आले दत्ता वानखेडे सध्या नांदेड रुग्णालयात उपचार घेत आहे सदर घटना वन विभागाच्या दुर्लक्षामुळे घडली आहेत अशी  ग्रामस्थांमध्ये चर्चा होत असून वन विभागाने जंगलाच्या भोवती कुंपण करणे गरजेचे आहे हे न केल्यामुळे सदरची घटना घडली आहे याबद्दल गावांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे हे शेतकऱ्यावर अस्वलाने हल्ला केला एवढा मोठा हल्ला केल्यामुळे हे शेतकरी जिवंत राहिला हा पन दैवी चमत्कारच मानावा लागेल. अशी चर्चा ग्रामस्थांतून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *