किनवट तालुका, प्रतिनिधी सी. एस. कागणे दिनांक १३ सप्टेंबर : या याबाबत सविस्तर वृत्त असे आहे की, दिनांक १२ सप्टेंबर रविवार रोजी बाजार असल्यामुळे दिनेश गुरनुले राहणार किनवट हे सायंकाळी पाचच्या सुमारास साई नगर येथून राजेंद्र नगर येथे तरकारी, ( भाजीपाला) घेण्यासाठी आपल्या गाडीवर आले होते यशोदा सदन घराच्या समोर जागांमध्ये खूप गाड्या असल्यामुळे दिनेश गुरनुले यांनी आपली गाडी नंबर एम एच २६ ए.बी. ३९०५ पॅशन प्रो टू व्हीलर ब्लॅक कलर (काळ्या रंगाची) येथे लावून मार्केट रोडवर भाजीपाला घेण्यास गेले मार्केट मध्ये भाजीपाला घेऊन परत आपल्या गाडीकडे आले तेव्हा त्यांना टू व्हीलर दिसली नाही त्यांनी नागरिकांना विचारपूस केली पण तेथे गर्दी जास्त असल्यामुळे कोणाच्याही लक्षात आले नाही की येथून टू व्हीलर चोरीला जात आहे या टु व्हीलर चोरीमुळे नागरिकांमध्ये भीतीच वातावरण पसरलेले आहे तरी नागरिकाकडून प्रशासनांना अशी मागणी होत आहे की वाहन चोरी करणाऱ्या चोराला पकडून कडक शिक्षा झाली पाहिजे असी मागणी किनवट ची जनता करत आहे.