मुखेड प्रतिनिधि, दि . १३ : मुखेड येथे नांदेड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष, व नांदेड जिल्हाबँकेचे उपाध्यक्ष मा. हरिहरराव भोसीकर साहेब,जिल्हासरचिटणीस प्रा. डि. बी. जांभरुणकर सर ,जिल्हा सचिव शरद जोशी, सोणवळे सर यांनी मुखेड येथे भेट दीली असता मुखेड रेस्टहाऊस येथे कार्यकर्त्याची बैठक झाली यावेळी जिल्हाध्यक्ष मा. हारिहररावजी भोसीकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रताप पाटील चौधरी व नागनाथ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली तातेराव टाळीकोटे , दिपक चंदर भद्रे, ज्ञानेश्वर व्यंकटी भद्रे या कार्यकर्त्यानी मुखेड राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्यात प्रवेश केला. नवीन कार्यकर्तेचे पक्षात यावेळी स्वागत करण्यात आले . राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा अध्यक्ष प्रताप पाटील चौधरी, मा.शहरध्यक्ष नागनाथ गायकवाड, संदीप पाटील बेटमोगरेकर,युवक ता. सचिव निळकंठ पाटील बेळीकर, युवक ता.उपाध्यक्ष निशांत पाटील, ता. कार्याध्यक्ष सामाजिक न्याय प्रकाश बनसोडे, ता.सचिव सेवादल संतोष मुंडे,शहर सचिव अशोक बचेवार,सुनील सावकार मुक्कावार, युवा कार्यकर्ते योगेश ननुरे अक्षय सागरे,प्रविण जिल्हेवाड, संदेश जाधव, आहेमद शेख, संदीप तोटरे चांडोळकर, वसंत काटेवाड, सरपंच सलगरा पवार, प्रल्हाद घायाळे सलगरकर, निशिकांत पाटील सर्वसेलचे पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.