कै.स्वराज जेट्ठेवार यांच्या स्मरणार्थ व बळीराजा गणेश मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या भव्य नेत्ररोग तपासणी व औषध उपचार शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
या शिबिरात २७६ नागरिकांनी घेतले लाभ
कुंडलवाडी प्रतिनिधी –रुपेश साठे दि.१८ :
कै.स्वराज जेट्ठेवार यांच्या स्मरणार्थ व श्री.बळीराजा गणेश मंडळाकडून एक अनोखा उपक्रम कुंडलवाडी शहरात घेण्यात आला असून या शिबिरात शहर व परिसरातील एकूण २७६
नागरिकांनी नेत्र दोष, नेत्र विकार तपासणी करून औषध उपचार घेतले आहे. सध्या मोठ्या प्रमाणात नेत्र दोष आढळून येत आहेत.त्यामुळे एक उल्लेखनिय कार्य बळीराजा गणेश मंडळाकडून घेण्यात आला असून या त्यांच्या अनोख्या उपक्रमाचे शहर व परिसरातुन कौतुक व अभिनंदन केले जात आहे.
या नेत्रविकार कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नगरीच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा सौ.सुरेखा नरेंद्र जिठ्ठावार यांचे प्रतिनीधी नरेंद्र नरहरराव जिठ्ठावार यांनी होते तर प्रमुख पाहुणे नगर परिषदेचे उपाध्यक्ष शैलेशसेठ -याकावार, नगर सेविका प्रतिनीधी गंगाधरराव खेळगे, सपोनि करीमखान पठाण, सपोउनि विशाल सुर्यवंशी जेष्ठ शिवसैनिक मोहणराव पांडे, चंद्रकांतराव बोधनकर, यांच्यासह अनेक नागरीक ही उपस्थित होते.
या शिबीरासाठी डॉक्टर लक्ष्मण चंदनकर, डॉ.कसबे व डॉ.शेख एक्बाल अहेमद हे नांदेड हुन यांच्यासह शहरातील वैद्यकिय अधिकारी डॉ. माहूरे हे पण उपस्थित होते. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव लक्ष्मीकांत येप्पुरवार,कुंडलेश्वर बांधकाम संघटनेचे अध्यक्ष तथा समाज सेवक सय्याराम मुक्केरवार, से.स.सो.चेअरमन रत्नागिरे राम, मलकुवार गंगय्या,गंगाधर पेंटावार, भिम पोतनकर, दिवशीकर, पानसरे पेंटावार, रामलु कोटलावार, सरप मित्र विजय गुप्ता, धोंडुराव शिंदे, बाबन्ना पेंटावार, पेंटाजी तोटावार, यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.
यावेळी शिबीरास आलेल्या सर्व वृध्द महिला पुरुषांना फळे वाटप करण्यात आले, तर या शिबीरात महिलेंची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.
यावेळी सपोनि करीमखान पठाण यांनीही आपल्या मनोगतातून विज्ञानाच्या प्रगतीवर प्रकाश टाकत माणुस आपल्या अवयवाकडे जाणून बुजून नजर अंदाज करत आहेत,असे ज्वलंत उदाहरण सांगितले.
हा कार्यक्रम हा स्वराज जेठ्ठेवार यांच्या स्मरणार्थ ठेऊन त्याच्या काही आठवणीला उजाळा मिळाला. यावेळी शैलेश सेठ -याकावार यांनी बळीराजा गणेश मंडळाचे या अभिनव उपक्रमाबाबत स्वागत केले. नगराध्यक्षा प्रतिनीधीनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातुन अशा प्रकारची उपक्रम हि काळाची गरज आहेअसे म्हणाले,अशा उपक्रमाला आमचे सहकार्य हमेशा असेल, मला आपण बोलावलात माझा सन्मान केलात या बद्दल मी आपला ऋणी आहे असे म्हणाले, तद्नंतर नेत्र विकार शिबिरास आलेल्या वृध्द महिला, व पुरुषांच्या नेत्र तपासनीस सुरुवात झाली. हा कार्यक्रम सकाळी अकरा पासून सुरु झाला, तर सायंकाळ पर्यँत चालू होता. या कार्यक्रमात शहर व परिसरातील महिला, पुरुषांची मोठी गर्दी होती तर शिबीर संपे पर्यँत महिला दोनशे तर पुरुष एकाहत्तर असे एकुण दोनशे एकाहत्तर जणांनी आपली तपासनी व औषधी उपचार घेतले आहे.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साई येप्पुरवार, साईनाथ बंडोपंत ठक्कुरवार, अशोक नागुलवार यासह आदिने परिश्रम घेतले. यावेळी मारोती पाटील शिवशेट्टे यांनी पाच हजार रुपयाच्या पॉरासिटमलच्या गोळ्या देऊन या सत्कर्मात आपला खारीचा वाटा उचलला आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार संतोष पाटील शिवशेट्टे यांनी मानले.