आंबेडकर नगर येथे १८४ नागरिकांनी घेतली कोरोना लस
कुंडलवाडी प्रतिनिधी– रुपेश साठे दि.१८:
येथील प्रभाग क्रमांक ०२ मधील आंबेडकर नगर व साठे नगरच्या नागरिकांसाठी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या अनुषगाणे जिल्हाधिकारी,जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या आदेशावरून तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १७ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे राष्ट्रवादी काँग्रेस युवक शहरध्यक्ष अमरनाथ कांबळे यांच्या आयोजनातून कोविड महा लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले होते,या शिबिरात एकूण १८४ नागरिकांनी लस घेतले आहेत.यावेळी लसीकरणाचे काम प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ.विनोद माहुरे,डॉ.नरेश बोधनकर,गणेश बनसोडे,सौ.एस.डी.सावंत,सौ.व्हि.जी.
देवकांबळे,सौ प्रतीक्षा पाटील,बेग अजीज,श्री.अंगद मुंडे,दत्तात्रय कदम,आदी आरोग्य कर्मचाऱ्यांनी पाहिले,हे शिबीर यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराध्यक्ष अमरनाथ कांबळे व नगरपालिका कर्मचारी मुंजाजी रेनगडे,हेमचंद्र पत्की,मारोती करपे,प्रकाश भोरे,शंकर जायेवार,मोहन कंपाळे रोहित हातोडे,राहुल कुंडलवाडीकर,नवज्योत कंपाळे,अजय वाघमारे,अजय भोसले,साईनाथ कंपाळे,जयराज कंपाळे,अजय भोसले,सुहास देवकरे,उदय वाघमारे,भीमराव हातोडे,आदींनी परिश्रम घेतले आहेत…..