श्री विसर्जन सोहळ्या दरम्यान अफवांवर विश्र्वास ठेवू नका-पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे

 

(प्रतिनिधी ज्ञानेश्वर कागणे) – दि. १८ : श्री गणेश विसर्जनासाठी पोलीस विभगाच्यावतीने मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. जनतेने कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलीस विभागासोबत सहकार्य करावे आणि कोणत्याही अफवांवर विश्र्वास न ठेवता अत्यंत जागरूकपणे श्री विसर्जन सोहळा पार पाडावा असे आवाहन पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी केले आहे.
नांदेड जिल्ह्यात होणाऱ्या १९ सप्टेंबरच्या श्रीविसर्जन सोहळ्यासाठी पोलीस अधिक्षक-१, अपर पोलीस अधिक्षक-२, पोलीस उपअधिक्षक-१०, पोलीस निरिक्षक-३१, सहाय्यक पोलीस निरिक्षक आणि पोलीस उपनिरिक्षक-१७०, महिला व पुरूष पोलीस अंमलदार-१२८९, आरसीपी प्लॉटून-८, एसआरपीएफ कंपनी-१, महिला होमगार्ड-१४८ आणि पुरूष होमगार्ड-९५६ असा मोठा पोलीस फौजफाटा तैनात केला आहे.
श्री विसर्जन सोहळ्यात कोणतीही अफवा जनतेसमोर आली तर त्याबद्दल अगोदर शहा-निशा करावी. आपल्याला कांही कळले तर ते पोलीसांपर्यंत पोहचवावे. नंतर पोलीस कायदेशीर कार्यवाही करतील. जनतेने अत्यंत आनंदात श्री विसर्जन सोहळा पार पाडावा. पोलीस सदैव जनतेच्या सेवेसाठी कार्यारत असल्याचे पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *