मुखेड जि.प्र. शाळेच्या परिसरात चालतो मटका व दारूचा व्यवसाय ? खा.प्रतापराव पाटील चिखलीकर
मुखेड ता.प्रतिनिधी : ज्ञानेश्वर कागणे दि.२० :
खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवन,नांदेड येथे दिशा कमिटीच्या समितीची बैठक पार पडली या बैठकीमध्ये दिशा समितीच्या सदस्यांनी आपले प्रश्न उपस्थित करत असताना मुखेड येथील शाळेच्या आजुबाजुच्या परिसरात व शाळेच्या जागेमध्ये मटका व दारू विक्री चा व्यवसाय चालु असताना सुध्दा त्यावर कुठलाही कार्यवाही का होत नाही असा प्रश्न खुद्द खासदारच विचारतात?
आकरा महिन्यापुर्वी हा प्रश्न खा.प्रतापराव पाटिल चिखलीकर यांनी दिशा समितीच्या समोर मांडला होता मात्र त्यावर कुठल्याही कार्यवाही झालेली नाही लवकरात लवकर त्यावर कार्यवाही करावी या साठी मी सुचना केल्या आहेत असे देखील खासदार म्हनाले आहेत.
नांदेड पासून जवळ असलेल्या माळेगाव तिर्थक्षेत्र असून तेथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होतो व मोठी यात्रा देखील होते पन तिथे जिल्हा परिषदची दोनशे एकर जागा असून त्यापैकी ऐशी एकर जागेवर अतीक्रमन आहे ते अतिक्रमण कधी काढनार? असा प्रश्न देखील उपस्थित केला गेला आहे सदरील अतिक्रमण लवकरात लवकर काढावे अशी सुचना देखील खासदार यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.