देगलुर (प्रतिनिधी) दि. २० :
तालुक्यातील दैनंदिन घडामोडी पत्रकारितेच्या माध्यमातून जनतेसमोर ठेवण्याचा प्रयत्न करीत असताना जनतेला पत्रकारांना संपर्क करण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत आहे . ही बाब पत्रकार शिष्टमंडळाने नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या निर्दशनास आणून देताच पत्रकार भवनासाठी जागा उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार यांनी पत्रकार शिष्टमंडळाना दिले आहे.
पत्रकार संघटनेचे अध्यक्ष श्याम वद्येवार यांच्या नेतृत्वाखाली शहर व परिसरातील पत्रकार शिष्टमंडळाने मुख्याधिकारी गंगाधर ईरलोड व नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार यांना एक सहानुभूतीक निवेदन सादर करून पत्रकार भवनासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती .
या मागणीच्या अनुषंगाने नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार म्हणाले की ,पत्रकार प्रतिनिधी हा समाजाचा आरसा आहे किंबहुना तो घटनेचा चौथा आधारस्तंभ मानला जातो. या पार्श्वभूमीवर पत्रकारांच्या ज्या काही अडी -अडचणी असतील त्या प्राधान्याने सोडविणे गरजेचे आहे. तालुक्यातील सर्व माध्यम प्रतिनिधी दैनंदिन घडामोडी जनतेसमोर मांडत असतात अशावेळी सर्वसामान्य जनतेना पत्रकार प्रतिनिधीशी संपर्क साधण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत आहे .मी एक पत्रकार व जनतेला दुवा म्हणून सर्व माध्यम प्रतिनिधीना एकाच छताखाली येण्यासाठी पत्रकार भवनासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी नगर परिषदेच्या वतीने पूर्णपणे सहकार्य करण्याचे आश्वासन नगराध्यक्ष यांनी दिले आहे. यावेळी शहर व परिसरातील सर्व माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते.