पुणे: जगाच्या कल्याणाकरिता संत-महात्मे अवतरत असतात अनुकूल आणि प्रतिकूल प्रतिबंध निवृत्तीची साधना संतांचे चरित्र शिकवीत असते असे प्रतिपादन ह भ प चैतन्य महाराज देगलूरकर यांनी केले ते देगलूर येथील देगलूर महाविद्यालयातील अध्यापक तथा लेखक महेश कुडलीकर यांनी लिहिलेला प्रवचन योगी वै. धुंडा महाराज देगलूरकर या चरित्र पुस्तिकेचे प्रकाशन करीत असताना विचार मांडले होते सध्याच्या कोरोना च्या पार्श्वभूमीवर ,नव्यानिर्बंधामुळे मोठा प्रकाशन सोहळा होऊ शकत नसल्याने श्री महेश कुडलीकर यांनी चरित्र पुस्तिका घेऊन
ह भ प चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या पुणे येथील निवासस्थानी दिनांक २८ जून रोजी छोटे छोटेखानी प्रकाशन सोहळा संपन्न झाला यावेळी विचार मांडताना ह भ प देगलुरकर म्हणाले श्रेयसाचे ज्ञान आणि त्याचे नियत साधन संत सांगतात वै. धुंडा महाराज देगलूरकर हे मराठवाडाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात प्रवचन किर्तनानी पिंजून काढला होता असा श्रेष्ठ विभूतीचा परिचय पुन्हा एकदा नव्याने आजच्या पिढीला या पुस्तिके मुळे होईल.
या चरित्र पुस्तिकेचे मुखपृष्ठ पुणे येथील चित्रकार संतोष धोंगडे यांनी सुबकपणे रेखाटले आहे याचाही उल्लेख त्यांनी यावेळी आवर्जून केला यावेळी अथर्व महेश कुडलीकर व आदी उपस्थित होते या वेळी वै धुंडामहाराज देगलूरकर स्मारक समितीचे महेश कुडलीकर यांनी आभार व्यक्त केले .