कुंडलवाडी प्रतिनिधी– रुपेश साठे दि. २५ :
कुंडलवाडी पासून जवळच अंतरावर असलेल्या मौजे चिरली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी दत्ताहारी तानाजी पाटील चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली.कुंडलवाडी विभागाचे केंद्र प्रमुख तथा प्रभारी शिक्षण विस्तार अधिकारी वाय. एस.कौठकर सर व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकळी चे मुख्याध्यापक बन्नारे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत चिरली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीची नवीन कार्यकारिणी निवड करण्यासाठी पालकांची आज दिनांक २४ सप्टेंबर रोजी एक खास बैठक बोलाविण्यात आली होती.या बैठकीत सर्व पालकांच्या अनूमतीने दत्ताहारी तानाजी पाटील चव्हाण यांची जि.प.प्राथमिक शाळा चिरली च्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी तर उपाध्यक्ष पदी सौ.क्रांती शिलानंद कैवारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.उर्वरित कार्यकारिणी पुढील प्रमाणे ठरविण्यात आली.सचिव–शाळेचे मुख्याध्यापक आय.एच.झंम्पलकर,शिक्षण तज्ञ सदस्य पदी केदार वसंतराव ढगे,सदस्य पदी–सौ.पुजा हणमंतराव वाघमारे, केशव हणमंतराव बोमले,सौ.श्रीदेवी आनंदराव धुप्पे,दिपक तानाजी ढगे,सौ.सुषमा अरविंद चव्हाण,पिंगळे खंडू लक्ष्मण, शिक्षक सदस्य पदी –सौ.एन.एस.दमकोंडवार व विद्यार्थी सदस्य पदी–शिवराज कुमार हणमंतराव,नरेंद्र दत्तात्रय बोगरे आदींची निवड करण्यात आली.याप्रसंगी शाळेतील सर्व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या नवीन कार्यकारिणीची गावात अभिनंदन व कौतूक होत आहे.उपस्थित सर्व पालकांचे व नुतन कार्यकारिणीचे व अधिकारी वर्गाचे शाळेचे मुख्याध्यापक आय.एच. झंम्पलकर यांनी आभार मानले.