मुखेड ता.प्रतिनिधी:-ज्ञानेश्वर कागणे २४ : सप्टेंबर
मुखेड-मुखेड तालुक्यातील मौजे डोंगरगाव येथील मन्याड नदीच्या काठावर पुरुष जातिचा हाडाचा सापळा दि २२ सप्टेंबर रोजी निदर्शनास आला आहे.हा हाडाचा सापळा कोनाचा आहे याचा शोध घेन्याचे पोलीस खात्यासमोर मोठे आव्हान आहे.
तालुक्यातील दि ६ ,७ सप्टेंबर रोजी झालेल्या अतीवृष्टी मुळे प्रत्येक नदि नाल्याला महा पुर आला होता याच पुरात वाहुन आलेला पुरुष जतिचा हाडाचा सापळा डोंगरगाव येथील नदिकाटच्या शेत शिवारात सापडला अशी माहीती डोंगरगावचे तंटामुक्ती अध्यक्ष बाबु हैदर यांनी पोलीस स्टेशन दिली त्यानुसार पोलीस निरीक्षक विलास गोबाडे,पो.ना.बालाजी गारूळे,कोकणे हे सर्व तात्काळ घटनास्थळी धाव घेउन त्या ठिकाणी पंचनामा केला
हाडाच्या सापळ्या जवळ जांभळ्या,हिरव्या व पांढऱ्या रंगाचे उभ्या ,आडव्या रेघा असलेला चेक्सचा शर्ट तसेच एक राखाडी कलरची नाईट पँट गुडग्याजवळ तसेच घोट्याजवळ काळ्या कपड्याचे पट्या असलेली नाईट पँट सापडली आहे .त्यावरुन आकस्मिक म्रुत्यु ची नोंद कलम १७४ सि आर पी सी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .पुढिल तपास पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पी.एस.कुंभारे हे करत आहेत.