लातूर प्रतिनिधी, दि.२८ : जिल्ह्यातील औसा तालुक्यातील टाका गावची कन्या पूजा अशोक कदम या विद्यार्थिनीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात ५७७ वा क्रमांक घेऊन यश संपादन केल्याबद्दल भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ रमेशआप्पा कराड यांनी त्यांचा यथोचित सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
दृष्टी कमी असतानाही कु. पूजा कदम यांनी दाखवलेली जिद्द कौतुकास्पद आहे, असे सांगून आ रमेशआप्पा कराड यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले व पुढील कारकीर्दीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी पूजा कदम यांचे वडील अशोक कदम, मातोश्री संध्या कदम, बहिण पल्लवी कदम, जयश्री कदम, पूनम कदम, चुलत भाऊ सुरेश नितीन अनिल आणि सचिन यांचाही आ रमेशआप्पा कराड यांनी सत्कार केला.
याप्रसंगी लातूर बाजार समितीचे संचालक विक्रम शिंदे अमोल पाटील भाजपा ओबीसी आघाडीचे मराठवाडा संपर्क प्रमुख डॉक्टर बाबासाहेब घुले भाजपा विधानसभा प्रमुख अनिल भिसे रेणापुरचे तालुकाध्यक्ष अँड दशरथ सरवदे पानगाव चे चेअरमन हरिकृष्ण गुरले गोपाळ शेंडगे महेंद्र गोडभरले रमाकांत फुलारी त्याचबरोबर पूजा कदम यांच्या टाका येथील गावचे ज्ञानोबा शिंदे गोविंद शेळके राजेंद्र शेळके प्रकाश शिंदे राहुल लोखंडे विलास शिंदे विष्णू जाधव दीपक शिंदे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.