चिखली किनवट तालुका येथे राशी ६५९ कापूस वानाचा पीक पाहणी कार्यक्रम संपन्न.

 

किनवट प्रतिनिधी, सी एस कागणे. दिनांक २९सप्टेंबर :
दिनांक२६ सप्टेंबर रोजी किनवट तालुक्यातील चिखली या गावात पीक पाहणी कार्यक्रम करण्यात आला चिखली येथील शेतकरी व्यंकटराव मुंडकर यांच्या शेतात राशी ६५९ या कापूस वाणाचे उत्पन्न घेण्यात आले होते.त्याच अनुसार काल पीक पाहणी कार्यक्रम करण्यात आला यावेळी राशी सीड्स कंपनीच्या वतीने पीक पाहणी कार्यक्रम घेण्यात  आले यावेळी रिजनल क्राप मॅनेजर श्री ज्ञानेश्वर महाजन,  आणि राशी कंपनीचे नांदेड जिल्हा प्रतिनिधी, राहुल रोढे सर हे उपस्थित होते यावेळी बोधडी आणि किनवट परिसरातील शेतकरी २० ते २५ गावातील ६५० ते ७०० शेतकरी बांधव या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कंपनीच्या वतीने सर्व शेतकरी बांधवांना कापूस पिका बाबत मार्गदर्शन केले यामध्ये अनेक शेतकर्यांना विविध उपहार देण्यात आले त्या नंतर  सर्व पीक पाहणी कार्यक्रमाचा शेतकरी बांधवांनी लाभ घेतला आणि कंपनीच्या वतीने  हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला यशस्वी करण्यास  व्यंकटराव मुंडकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *