किनवट प्रतिनिधी, सी एस कागणे.दिनांक ३० सप्टेंबर :
दिनांक २९ सप्टेंबर पंचायत समिती किनवट अंतर्गत येणाऱ्या मोजे माळबोरगाव कनकवाडी मारेगाव चे ग्रामसेवक अतुल लक्ष्मणराव लष्करे यांनी दिनांक २९ सप्टेंबर रोजी सकाळी पाच वाजेच्या सुमारास गोकुंदा येथील दत्त नगर मधील किरायाच्या रूम मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली त्यांचा पोलीस पंचनामा करण्यात आला आहे.मात्र आत्महत्येचे कारण अद्याप कळलेले नाही ते मूळ रहिवासी मौजे पाळा तालुका मुखेड जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून त्यांचे ३८ वर्ष होते. गेल्या पाच वर्षापासून पंचायत समिती अंतर्गत ग्रामसेवकाचे कर्तव्य बजावत होते. अतुल लष्करे यांच्या कुटुंबात तयांची पत्नी, मुलगा, व एक मुलगी आहे हे कुटुंब दत्तनगर येथे राहात होती आणि मौजे पाळा येथे आई, वडील, आणि भाऊ राहत होते.
अतुल लष्करे यांच्या आत्महत्या बाबत पुढील तपास किनवट पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार चौधरी हे करत आहेत.