कुंडलवाडी नगरपालिकेचा अनोखा उपक्रम
कुंडलवाडी प्रतिनिधी– रुपेश साठे,
कुंडलवाडी शहरातील ज्येष्ठ नागरिक व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना शहरात एकत्र ठिकाणी बसून गप्पा मारण्यासाठी व त्यांचा वेळ जाण्यासाठी बैठक व्यवस्था नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिक हे मुख्य बाजारपेठेतील जमेल त्या ठिकाणी बसून गप्पा मारत होते. अशा ज्येष्ठ नागरिक व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सोईसाठी नगरपालिका प्रशासनाने थोडेसे माय बापा साठी पण या उपक्रमा अंतर्गत मुख्य बाजारपेठेतील कै. के. रामलु शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये एका हाॅल मध्ये वृद्ध नागरिकांसाठी वृद्ध नागरिक कक्षाचे उद्घाटन केले आहे .या कक्षा मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी बैठक व्यवस्था ,वाचन करण्यासाठी वर्तमानपत्र ,विरंगुळा व मनोरंजनासाठी टीव्ही अशी व्यवस्था करण्यात येणार आहे अशी माहिती मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांनी दिली आहे .असा अनोखा उपक्रम नगरपालिका प्रशासनाने राबविल्याबद्दल ज्येष्ठ नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. यावेळी वृद्ध नागरिक कक्षाचे उद्घाटन नगराध्यक्षा सुरेखा जिटावार यांच्या हस्ते करून ज्येष्ठ नागरिक गंगाधर जाये वार ,गंगाधर पेंटावार ,मोहनाजी कोटला वार ,नागनाथ जायेवार,लक्ष्मण गांजरे, गोदावरी पेंटावार,आदींचा यथोचित सन्मान करण्यात आला .या प्रसंगी मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे, नगराध्यक्ष प्रतिनिधी नरेंद्र जिटावार, अंजू ताई दाचावार,नगरपालिका अधीक्षक सुभाष निरावार, मुंजाजी रेंगडे,गंगाधर पत्की ,शंकर जायेवार, मारुती करपे, मोहन कपाळे, धोंडीबा वाघमारे, शुभम दीलोड, निर्मला वाघमारे आदी उपस्थित होते.